रिकव्हरी मॅनेजमेंट सिस्टीम भाग – III (फोन वसूली)
सर्व प्रकारच्या बँक व पतसंस्थांच्या कर्ज वसूलीकरिता व कर्जाच्या हप्त्यांच्या नियोजनबद्ध पाठपुराव्याकरिता आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेली अत्याधुनिक प्रणाली.
कर्जाचे हप्ते वेळेत येण्याकरिता आपण बहुतांश वेळा कर्जदाराशी संपर्क करण्यासाठी आपण आपल्या मोबाईल फोनचा वापर करतो.
याच मोबाईलचा वापर करून आपल्या कर्मचाऱ्यांना ठराविक कर्जदारांची तसेच थकबाकीदारांची यादी मोबाईल नंबर सहित एकाच ठिकाणावरून वितरीत करता येईल. त्या करिता कर्मचाऱ्याच्या ANDROID मोबाईलमध्ये "Call Recovery Management" हे मोबाईल APP असेल.
त्या APP मध्ये कर्मचाऱ्याला वितरीत झालेले कर्जदाराचे तसेच थकबाकीदाराचेच मोबाईल अथवा फोन नंबर दिसतील. मोबाईलवर असलेल्या aap मधून फोन करता येतील. केलेल्या फोनची तारीख, वेळ व फोनवर झालेले बोलणे हे आपोआप सर्व्हरवर साठविले जावून अधिकाऱ्याला उपलब्ध होऊ शकेल.
ह्या APP मुळे कर्जदाराशी झालेला संपर्क कोणी केला व किती वेळा केला याची संपूर्ण नोंद ठेवली जाईल. ही माहिती आपल्याला आवश्यक तेव्हा उपलब्ध असेल.