रिकव्हरी मॅनेजमेंट सिस्टीम भाग – II (कारवाई १५६ )
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०१ अन्वये मिळालेले व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चा नियम १०७ (३) अन्वये वसूलीचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र सह. संस्थांचे अधिनियम १९६० चे कलम ९१ अन्वये मा. ना. सहकार न्यायालय यांनी जमीन महसुलाची थकबाकी समजून, सक्तीच्या मार्गाने वसूलीचा दिलेला निवडा आणि ९८ (ब) अन्वये डिक्रीचा आदेश प्राप्त झालेल्या वसूलीच्या दाखल्यानंतर किंवा अशा अन्य मार्गाने मिळालेला वसूली दाखला यांची वसूली मान्यताप्राप्त वसूली अधिकाऱ्यांच्यामार्फत करवायची कारवाई म्हणजे १५६ ची वसूलीची कारवाई
रिकव्हरी मॅनेजमेंट सिस्टीम भाग – II म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त वसूली अधिकाऱ्यांच्यामार्फत १५६ या वसूलीच्या कायद्यानुसार करावयाच्या कारवाईमध्ये सुसूत्रता, गतीशीलता व पारदर्शकता आणण्यासाठी तयार केलेली अत्याधुनिक संगणक प्रणाली आहे.
या प्रणालीमुळे मान्यताप्राप्त वसूली अधिकाऱ्यांच्या कामाची गती वाढविण्याचा व कामामध्ये होणाऱ्या चुका टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. ही प्रणाली वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ आहे.
ही प्रणाली वापरल्यास ....
- थकबाकी अथवा वसूल रकमेची माहिती संकलित होऊन सहजरीत्या उपलब्ध होईल.
- वसूली अधिकाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता वाढून वसूलीमध्ये गतीशीलता येईल.
- एकूण आलेला वसूल, त्यावर लागणारा सरचार्ज व वसूलीच्या कामाचा मोबदला यांचा हिशेब ठेवणे सहज शक्य होईल.
- सुबक व बिनचूक नोटिस, आदेश, पत्रं, प्रस्ताव आणि वृत्तपत्र जाहिराती तयार करता येतील.
- नोटिस दिलेल्या तारखांची संपूर्ण माहिती न्यायलयीन वादात किंवा इतर कायदेशीर कामासाठी सहज उपलब्ध होईल.
- वसूली अधिकाऱ्यांचे लिखाणकाम संपूर्ण कमी होऊन वसूलीच्या कामाकडे लक्ष देता देणे शक्य होईल.
- एकच माहिती अनेकवेळा प्रत्येक नोटिस मध्ये लिहिण्याच्या कंटाळवाण्या कामातून मुक्तता होईल.
- वसूलीच्या सर्व कामामध्ये सुसूत्रता येऊन वसूलीचे प्रमाण वाढेल.
-
या प्रणालीतून निघणाऱ्या नोटिस .....
- जंगम स्थावर मालमत्ता जप्ती पूर्वीची मागणी नोटिस (सुनावणी -१)
- जंगम स्थावर मालमत्ता जप्ती पूर्वीची शेवटची मागणी नोटिस
- जंगम मालमत्ता जप्ती आदेश
- जंगम जप्तीचा पंचनामा
- जप्त जंगम माल लिलावापुर्वीची नोटिस
- जप्त जंगम माल जाहीर लिलावाची नोटिस
- जप्त जंगम माल विक्री कायम केल्याचा आदेश
- पगारची माहिती मिळणेबाबत पत्र
- पगारची माहिती मिळणेबाबत स्मरणपत्र
- पगार जप्ती आदेश
- पगार जप्ती आदेश स्मरणपत्र
- बँक अकाऊंट सील आदेश
- स्थावर जप्तीचा पंचनामा
- स्थावर मालमत्तेची माहिती मिळणेसाठी तलाठी ग्रामसेवक पत्र
- स्थावर मालमत्ता जप्ती पूर्वीची नोटिस
- स्थावर मालमत्ता जप्ती हुकूम
- स्थावर मालमत्ता जप्ती हुकूम (पेपर जाहिरात)
- बोजा नोंद बाबत तलाठी ग्रामसेवक यांना पत्र
सुरवातीच्या नोटिस व आदेश
जंगम मालमत्ता जप्ती संदर्भातील नोटिस व आदेश
पगार जप्ती संदर्भातील नोटिस, पत्रं व आदेश
बँक खाते जप्ती संदर्भातील नोटिस व आदेश
स्थावर मालमत्ता जप्ती संदर्भातील नोटिस, पत्रं व आदेश
-
मूल्यांकन संदर्भातील अर्ज, प्रस्ताव व आदेश
- मूल्यांकन मागणी अर्ज
- अपसेट प्राइस ठरविणे व लिलावास परवानगी मिळणेबाबत पत्र
- अपसेट सुनावणी निबंधक यांचे मार्फत
- अपसेट प्राइस ठरवून लिलावास मान्यता
- स्थावर मिळकत विक्रीचा जाहीरनामा (लिलाव)
- स्थावर मिळकत विक्रीचा जाहीरनामा पेपर जाहिरात (लिलाव)
- लिलाव खर्डा
- अटी व शर्ती
- पंचनामा
- र मिळणे बाबत प्रस्ताव
- र प्रस्ताव सुनावणी
- र दाखला
- स्थावर बोजाची नोंद कमी करणे
- पंचनामा
- आज देण्याच्या नोटिस
- 'र' समरी
- बंद झालेल्या खात्यांचा तपशील
- वसूली पूर्ण झालेल्या खात्यांचा तपशील
- सरचार्जचे कॅलक्युलेशन
- १५६ च्या कारवाईमुळे वसूल झालेल्या खात्यांचा तपशील
- वसूलीचे लेजर
- वसूलीचा तपशील (दिनांकानुसार)
- वसूलीचा तपशील वार्षिक
- सहामाही रिपोर्ट
लिलावाची संपूर्ण कारवाई
१०० – ८५ दाखला किंवा ' र ' दाखला मिळविण्याची संपूर्ण कारवाई
वन टाइम सेटलमेंटचे कॅलक्युलेशन
वसूलीच्या नियोजन, नियंत्रणाकरिता वसूली अधिकारी आणि वसूली विभाग प्रमुखच्या उपयोगाचे
वसूलीच्या नियोजन, नियंत्रणाकरिता संचालक मंडळाच्या उपयोगाचे